Mumbai Infrastructure : मेट्रो लाईन 3 बुलेट ट्रेन टर्मिनसला जोडणार; नवीन अंडरग्राऊंड बोगदा प्रस्तावित

Mumbai Infrastructure Underground Tunnel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Infrastructure । मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्शर बाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील आगामी बुलेट ट्रेन टर्मिनलला (Bullet Train Terminal) सध्याच्या बीकेसी मेट्रो ३ स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. यासाठी १.३ किमी लांबीचा अंडरग्राऊंड बोगदा उभारण्याची योजना सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा व्हावा, तसेच शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी राखता यावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे.टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

कसा असेल बोगदा? Mumbai Infrastructure

या नव्या अंडरग्राऊंड बोगद्यासाठी (Underground Tunnel) नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL), मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्यात १ जुलै रोजी एक बैठक झाली. १.३ किलोमीटर लांबीचा हा अंडरग्राऊंड बोगदा, हाय-स्पीड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवरून न जाता मुंबई मेट्रो लाईन ३ पर्यंत सहजपणे घेऊन जाईल. हा बोगदा पुश बॉक्स पद्धतीने जमिनीखाली १२ मीटर खोल बांधला जाईल आणि वाकोला नाल्याखालून जाईल. बीकेसी मेट्रो स्टेशनपासून आगामी बुलेट ट्रेन टर्मिनसपर्यंत सामान वाहून नेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोप्पा होईल. तसेच नवीन बोगद्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल, ऑटो आणि टॅक्सीसारख्या फीडर मोडवर जास्त अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. Mumbai Infrastructure

मेट्रो ३ चे बीकेसी स्टेशन वांद्रे-कुर्ला लिंक रोडवरील आयकर कार्यालय (ITO) जंक्शनवर आहे, तर बुलेट ट्रेन टर्मिनल जवळच असेल, परंतु सध्या थेट प्रवेशाचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना उतरावे लागेल, बाहेर पडावे लागेल आणि दुसऱ्या मेट्रो स्टेशनमध्ये पुन्हा प्रवेश करावा लागेल किंवा फीडर सेवा वापरावी लागतील, परंतु नव्या प्रस्तावित अंडरग्राऊंड बोगद्यामुळे हा त्रास वाचेल. बोगद्याचा मार्ग निश्चित झाला असला तरी, बांधकाम जबाबदारी, बजेट आणि अभियांत्रिकी तपशीलांबाबत विशिष्ट निर्णय प्रलंबित आहेत. हा बोगदा मुंबईच्या सीएसएमटी आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवर आढळणाऱ्या सबवेसारखा असण्याची शक्यता आहे. हा अंडरग्राऊंड बोगदा बांधण्यासाठी अंदाजे बजेट १०० कोटी ते १५० कोटी रुपये खर्च होऊ शकतो असं बोललं जातंय.