हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Infrastructure। तुम्हाला मुंबईतील मरीन ड्राइव्ह हे ठिकाण तर माहीतच असेल. मुंबईतील सर्वात लोकप्रिय असलेल्या या ठिकाणाला १०० वर्ष झाली, मात्र आजही मुंबईतील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून मरीन ड्राइव्ह कडेच बघितलं जात. नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी असा हा समुद्रकिनारी रस्ता आहे. येथून अरबी समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात.. अतिशय रोमहर्षक असं ते दृश्य असते. दरवर्षी लाखो पर्यटक मरीन ड्राईव्हला भेट देतात आणि एन्जॉय करतात…आता मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आणखी एक मरीन ड्राईव्ह मिळणार आहे.
येत्या १५ जून ला कोस्टल रोडवरील बहुप्रतिक्षित विहार मार्गाचे उद्घाटन (Mumbai Infrastructure) होणार आहे. ब्रीच कँडी येथील प्रियदर्शिनी पार्क आणि वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकादरम्यानचा ७.५ किलोमीटरचा, २० मीटर रुंद मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. याठिकाणी चालण्यासाठी, धावण्यासाठी आणि सायकलिंगसाठी विशेष डिझाइन केलेला प्रोमेनेड उपलब्ध आहेखास करून सायकलस्वारांसाठी हा मार्ग वरदान ठरण्याची अपेक्षा आहे. सुलभता लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या या विहार मार्गात प्रत्येकी ४०० मीटरवर २० अंडरपास असतील, ज्यामुळे समुद्राच्या दिशेला आणि त्याच्या विरुद्ध बाजू दरम्यान सहज क्रॉस करता येईल. इथला परिसर म्हणजे जणू दुसरं मरीन ड्राईव्हच आहे.
३०% जागेत पायवाट- Mumbai Infrastructure-
१२ हेक्टरचा हा परिसर मुंबई महापालिकेने डेव्हलप केला आहे. नवीन जागेच्या सुमारे ७०% भागात हिरवेगार लँडस्केपिंग असेल तर उर्वरित ३०% जागेत पायवाट, सायकल ट्रॅक आणि सार्वजनिक बसण्याची जागा असेल. हा उपक्रम मुंबईच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वॉटरफ्रंट सुलभता वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या मार्गावर ९ उद्यानं आणि गार्डन्स विकसित केली जात आहेत, ज्यात बटरफ्लाय पार्क, ओपन थिएटर आणि इतर मनोरंजन केंद्रांचा समावेश आहे. हा प्रकल्प मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा आणि शहरवासीयांसाठी एक नवीन विहारस्थळ उपलब्ध करून देणारा ठरणार आहे.




