मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ठरले जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ ठरले अाहे. नुकतेच मुंबई येथील आंतराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ म्हणुन गौरवण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांनी मुंबई विमानतळाला चांगले गुण दिल्याने हा पुरस्कार देण्यात आल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी म्हटले आहे. कॅनडामध्ये झालेल्या कार्यक्रमात चषक स्विकारताना ते बोलत होते.

एसीआय ही हवाई वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असून जगातील १७८ देशांमध्ये १,९५३ विमानतळे त्याचे सहयोगी आहेत. हवाई प्रवाशांना समाधानकारक सेवा देऊन प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांच्या आधारे ३४ मुद्द्यांवर संस्थेतर्फे जगातील विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्वेक्षण करण्यात आले व त्यामध्ये मुंबई विमानतळाची सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड करण्यात आली. चेक इन, सुरक्षा तपासणी विश्रांतीगृह, रेस्टॉरन्टस व इतर मुद्द्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

Leave a Comment