Mumbai Local : तसे पाहायला गेले तर मुंबईतले तापमान हे दमट आणि बऱ्याच अंशी उष्ण असते. अशा तापमानात मुंबईच्या लोकलचा प्रवास म्हणजे विचारूच नका. भयानक गर्दी आणि त्यातून लोकल पकडायची म्हणजे तारेवरची कसरत. पण आता मुंबईतील लोकलचा प्रवास हा गारेगार आणि आरामशीर होणार आहे. कारण मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल दाखल होणार आहेत. मध्य रेल्वेने अंडरस्लग एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली होती. अद्याप एसी लोकलची चाचणी (Mumbai Local) बाकी असल्यामुळे ती वापरण्यात आली नाही. मात्र लवकरच या एसी लोकल वापरण्यात येणार आहेत.
प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा (Mumbai Local)
या गाडीचे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या लोकलची मोटर ही डब्याच्या बाहेर बसवलेली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा लोकलमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणूनच बरीचशी ऐस पैस जागा या नव्या एसी लोकलमध्ये असणार आहे. त्यामुळे गर्दी झाली तरी प्रवाशांना नीट या लोकलमध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळू शकणार आहे. सध्या कुर्ला कारशेडमध्ये नवीन अंडरस्लंग एसी लोकल आहे. याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच या लोकल धावण्यास सज्ज होतील. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीच्या एसी लोकलमध्ये 1,028 प्रवासी बसू शकतात. तर या नवीन एसी लोकलमध्ये एकूण 1,116 प्रवासी बसू शकतात.
लोकलसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद (Mumbai Local)
- मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रोला आर्थिक रसद तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असून मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 1,255.06 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गंत रेल्वे प्रकल्पांसाठी 611.48 कोटींची (Mumbai Local) तरतूद करण्यात आली आहे.