Mumbai Local : आता चुकूनही चुकणार नाही तुमची लोकल ; पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. अनेकदा ऑफिसला जाण्याच्या गडबडीत प्रवासी चुकीच्या लोकलमध्ये चढतात. किंवा बऱ्याचदा आपण घाई गडबडीत आणि गर्दीत कोणत्या लोकलमध्ये चढलो हेच समजत नाही. पण आता असे होणार नाही. कारण मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवला जाणार आहे. प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्मकडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे.

तिन्ही भाषांमध्ये लोकलची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये लोकलची माहिती ३ सेकंदांच्या अंतराने दिसणार आहे. एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे आता लोकलला डिजीटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर डिजीटल डिस्प्लेचा प्रयोग केला जाणार आहे.

प्लॅटफॉर्म वर बसून मिळणार लोकलची माहिती

उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.

पॅनरोमा डिस्प्ले म्हणजे काय ?

  • हा डिजिटल डिस्प्ले फुल एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) आहेत.
  • हा डिस्प्ले काचेने संरक्षित आहेत
  • त्याच्या ब्राइटनेसमुळं लोकांना स्क्रीनवर कोड सहज पाहता येईल
  • डिस्प्ले स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो जेणेकरून मजकूर 5 मीटरपर्यंतच्या अंतरावरून स्पष्टपणे दिसतो
  • डिस्प्लेची किंमत अंदाचे १.७५ लाख रुपये इतकी असून, रेल्वेच्या एका गाडीवर बसविण्याचा खर्च सुमारे १४ लाख इतकी असणार आहे.