Mumbai Local : मुंबईकरांचे पावसाळ्याचे टेन्शन मिटले; पश्चिम रेल्वेने दिली Good News

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. आत्ता असलेल्या रेल्वे गाड्यांशिवाय उपनगरांना जोडण्याचे काम रेल्वे विभागाकडून केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने गोरेगाव ते कांदिवली (Mumbai Local) दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. याबाबतची माहिती पश्चिम रेल्वेने माहिती दिली आहे.

4.7 किमीचा पहिला टप्पा लवकरच होणार खुला (Mumbai Local)

गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचा 4.7 किमीचा पहिला टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी मालाड, कांदिवली रेल्वे स्थानकात मार्गिकेचे काम सुरू आहे. कांदिवलीपर्यंत जूनअखेर सहावी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. तसंच, 15 मेपर्यंत पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं उष्णतेच्या या दिवसांत प्रवाशांना गारेगार (Mumbai Local) प्रवास अुनभवता येणार आहे. तसंच, गोरेगाव-कांदिवलीदरम्यान रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यास नागरिकांना आणखी वाढीव फेऱ्या मिळणार आहेत.

12 पूल उभारण्यात येणार (Mumbai Local)

कांदिवलीदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी एकूण 12 पूल उभारण्यात येणार (Mumbai Local) आहेत. यापैकी आठ रेल्वे पुलांचे काम पूर्ण झाले असून 4 पुलांचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिग्नलिंगचे काम जवळपास 70 टक्के काम आणि ओव्हरहेड वायरचे काम 30 टक्के पूर्ण झाले आहे. बोरीवली ते मुंबई सेंट्रलदरम्यान 30 किमीपर्यंतची सहावी मार्गिका तयार होत आहे. लोकल ट्रेन मेल-एक्स्प्रेसपासून वेगळ्या ठेवण्यासाठी पाचव्या व सहाव्या मार्गिका तयार करण्यात येत आहे.

कशा असतील मार्गिका ? (Mumbai Local)

मुंबई सेंट्रल ते बोरीवलीदरम्यान दोन धीम्या आणि दोन जलद मार्गिका आहेत. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल एक्स्प्रेस या पाचव्या मार्गिकेवरुन रवाना होतात. एकाच मार्गिकेवरुन मेल-एक्स्प्रेस चालवल्या जातात. शक्यता जलद मार्गिकेचा (Mumbai Local) वापर होतो. यामुळं लोकल फेऱ्यावर परिणाम होतो. लोकल विलंबाने धावतात यासाठीच 30 किमी लांबीच्या सहाव्या मार्गिका उभारणीचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव- कांदिवलीपर्यंतचा 4.5 किमी लांबीचा मार्ग जवळपास तयार आहे. तसंच, भूसंपादनाच्या काही तक्रारी दूर झाल्यास यावर्षातच नोव्हेंबरपर्यंत बोरीवलीपर्यंत (Mumbai Local) सहावी मार्गिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर 2023मध्ये खार ते गोरेगावपर्यंत सहावी मार्गिका सुरू झाली होती.