Mumbai Local Mega Block: रविवार म्हणलं की मुंबई लोकलला सर्वात जास्त गर्दी पाहिला मिळते. रविवारच्या दिवशी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वात जास्त असते. परंतु मुंबई लोकलने रविवारचे मेगाब्लॉक घेतले की प्रवाशांचे हाल होतात. आता या रविवारी ही लोकल प्रवाशांना याच मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. येत्या 19 मे 2024 रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. यामुळे रविवारी रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो. (Mumbai Local Mega Block)
मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरी रेल्वे रुळांवरील दुरुस्ती काम आणि सिग्नल यंत्रणेबाबत तांत्रिक काम करण्यात येणार असल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गाच्या माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गाच्या कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक राहील. यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अधिकच्या गर्दीचा सामना करावा लागेल.
मेगाब्लॉकमुळे झालेले बदल (Mumbai Local Mega Block)
मध्य रेल्वेमार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील. त्यामुळे CSMT वरून निघणाऱ्या Fast Local माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. यासह पुढे या लोकल ठाण्यापासून जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाण्यामधून सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड ते माटुंग्यादरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील.
हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11.10 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 10 मनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील. याकाळात वाशी, बेलापूर आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द असतील. तसेच, सीएसएमटीहून पनवेल, वाशी आणि बेलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल देखील बंद असतील. (Mumbai Local Mega Block)