Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Megablock : जर तुम्ही उद्या लोकल ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. उद्या रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घरातून बाहेर निघण्यापूर्वी रेल्वेचे (Mumbai Local Megablock) हे वेळापत्रक नक्की चेक करा आणि मग बाहेर पडा.

मध्य रेल्वेने रविवारी, 11.02.2024 रोजी मेगा ब्लॉक (Mumbai Local Megablock) तर पश्चिम रेल्वेने पश्चिम मार्गावरील जंबो ब्लॉक जाहीर केले आहेत. रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेने माटुंगा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 03.35 पर्यंत ब्लॉक (Mumbai Local Megablock) जाहीर केला आहे. त्यामुळे या मार्गावर धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर

हरबर मार्ग पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्ग सकाळी 11 पाच ते दुपारी 4.05 प्रयन्त ब्लॉक (Mumbai Local Megablock) असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे ते वाशी नेरूळ आणि बेलापूर नेरूळ उरण दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

सांताक्रुज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ब्लॉक असेल त्यामुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या घेण्यामार्गावर वळवण्यात येणार आहेत त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाला धावणार आहेत प्रवाशांच्या सुविधांसाठी हार्बर गोरेगाव मार्गे लोकल चालवण्यात येणार आहेत