Mumbai local : मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल. अनेक चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम लोकल करते. लोकल ने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. मुंबई करांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. लोकलमध्ये वाढणारी गर्दी हे त्याचे मुख्य कारण आहे. मात्र प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा मध्य रेल्वे कडून नवीन वेळापत्रक बनवण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दादर (Mumbai local) स्थानकातून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
लोकलचे नवीन वेळापत्रक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असून दादर स्थानकातून दहा लोकल फेऱ्या तर परळस्थानाकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू (Mumbai local) होणार आहेत. सीएसएमटी हून सुटणाऱ्या दहा फेऱ्या दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. यात पाच अप आणि पाच डाऊन लोकलचा समावेश असणार आहे. तर दादर मधील फलाट क्रमांक 10 चे डबल प्लॅटफॉर्म झाले आहे. त्यामुळे जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने याच्यावर करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दादर स्थानकातून सुरू होणाऱ्या 24 धीम्या लोकल फेऱ्या (Mumbai local) परळस्थानाकातून चालवण्यात येणार आहे. सध्या परळस्थानाकातून 22 गाड्या सुटतात. आता एकूण ही संख्या 46 वर पोहोचणार आहे.
कळवा आणि मुंब्रा मधील रेल्वे प्रवाशांना नव्या वेळापत्रकानुसार दिलासा मिळणार आहे. कारण सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत एका अतिरिक्त लोकलचा थांबा इथे देण्यात आलेला आहे. ठाणे स्थानकांपर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याण (Mumbai local) पर्यंत विस्तार करण्यात येणार असून त्यामुळे एकंदरीतच प्रवाशांना नव्या वेळापत्रकामधून मोठा दिलासा मिळणार आहे.