Mumbai local updates : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मध्य-हार्बर मार्गावरील रेल्वे धावणार उशिरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai local updates : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मुंबईतही रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे लोकलवर मोठा परिणाम झाला असून सोमवारी ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे काही काळासाठी लोकल स्थगित करण्यात होत्या. नवी मुंबई सह ठाण्याच्या स्टेशनवर सुद्धा ओफिसला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान आज मंगळवारी मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार असून काही ठिकाणी पावसाने उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांना (Mumbai local updates) दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आज पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे. मात्र मध्य आणि हार्बर रेल्वेवर पावसाचा परिणाम(Mumbai local updates) झाला असून या मार्गावरील रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू झाल्या आहेत . मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सध्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. याबाबतची माहिती रेल्वे स्थानकांवर घोषणांद्वारे दिली जाते आहे.

दरम्यान सोमवारी लोकलची व्यवस्था कोलमडल्यामुळे प्रवाशांना (Mumbai local updates) गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. तर हार्बर मार्गावरील वाहतूक ही जवळपास 15 मिनिटं उशिराने सुरू आहे.

पावसामुळे प्रशासन अलर्ट (Mumbai local updates)

राज्यभरात पावसाने दमदार बरसायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, नवी मुंबई येथे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे पालिका प्रशासनाने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.