हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरू मा कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवल अशी टीका केली. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले असल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावलं.
तुम्ही गुरू माँ असा किंवा गुरू पिता, त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही. पण थेट राजकीय वक्तव्य करू नका. बाळासाहेबांचा मुलगा काय करू शकतो आणि काय नाही ही सर्टिफिकेट तुम्ही देण्याची गरज नाही,’ असं पेडणेकर यांनी कांचन गिरी यांना सुनावलं आहे. तुम्हाला जो अजेंडा चालवायचा तो चालवा. आमचं काही म्हणणं नाही. पण हिंदुत्वाच्या फूटपट्टया घेऊन बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना मोजण्याचा प्रयत्न करू नका,’ असा इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.
कांचन गिरी नेमकं काय म्हणाल्या-
बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर मी नाराज आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे. पालघरमध्ये हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, असी टीकाही यावेळी कांचन गिरी यांनी केली आहे.