Mumbai Mega Block Update : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन्स बद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे (Mumbai Mega Block Update) जावे लागणार आहे.
930 लोकल सेवा रद्द केल्यामुळे लोक रस्त्याने सीएसएमटी गाठण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणारे अनेक प्रवासी त्यांची वैयक्तिक वाहने, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करतील. त्याचबरोबर 63 तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block Update) लक्षात घेता बेस्ट, एसटी, टीएमटीने सुमारे 350 जादा बसफेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ब्लॉकचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
CSMT ला पोहचण्याचे पर्याय ? (Mumbai Mega Block Update)
ब्लॉक दरम्यान कर्जत किंवा कसारा येथून येणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानकात उतरून पश्चिम रेल्वेने सीएसएमटी गाठता येईल. पनवेल दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांना वडाळा स्थानकात उतरून रस्त्याने सीएमएसटी गाठण्याचा पर्याय असेल. विरार, डहाणू येथून येणारे प्रवासी चर्चगेट स्थानकात उतरून रस्त्याने सीएसएमटीला पोहोचू शकतात.
कसा असेल ब्लॉक ? (Mumbai Mega Block Update)
ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक 30 मे रोजी सकाळी 12.30 वाजता सुरू होईल. हा ब्लॉक 2 जून रोजी दुपारी 15.30 वाजेपर्यंत असेल. तर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारासाठी 31 मेच्या रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 31 मे रोजी सकाळी 12.30 ते 2 जून रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 36 तासांचा ब्लॉक असेल.
धावणार बेस्ट आणि एसटीच्या जादा बसेस
लोकल सेवा रद्द करताना प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी बेस्ट आणि एसटीने उचलली आहे. बेस्ट आणि एसटीने ब्लॉकदरम्यान 305 अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टने (Mumbai Mega Block Update) जास्तीत जास्त 254 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली असून एसटीने 50 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.