Mumbai Metro : 24 तास व्यस्त असणारं शहर म्हणून ज्याची ओळख आहे अशा मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिअशय आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांची लवकरच ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. कारण याच जुलै महिण्याच्या 24 तारखेपासून मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो धावणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी आपल्या X अकाऊंटवरून दिली आहे.
त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याची हमी दिली होती, ती आता पूर्ण होणार आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अक्वा लाईन) 24 जुलैपासून सुरू होत आहे, जी शहराला नवी उभारी देणार आहे” .अशा आशयाचे ट्विट करत या पोस्ट सोबत त्यांनी एक विडिओ पोस्ट केला आहे.
मुंबईच्या या पहिल्या टप्प्याच्या भूमिगत मेट्रो प्रकल्पामध्ये 33.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. हा मार्ग आरे कॉलनी पासून सुरू होणार असून या अंतर्गत 27 स्थानके असणार आहेत. त्यापैकी 26 स्थानके ही भूमिगत असणार असल्याची माहिती आहे. मेट्रोच्या एकूण मार्गातील पहिला टप्पा हा आरे कॉलनी ते बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) असा आहे. हाच पहिला टप्पा 24 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.
या स्थानकांचा समावेश
चर्चगेट, विधान भवन, कफ परेड, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, सेंट्रल मुंबई, मेट्रो महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहारा रोड, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मोरल नाका, एमआयडीसी, सीप्झ, आरे कॉलनी
काय असेल ट्रेनची वेळ
मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो सेवा ही सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आणि रात्री 11:00 वाजेपर्यंत असेल.