Mumbai Metro : मुबईकरांसाठी खुशखबर ! लवकरच धावणार मेट्रो 9, ‘या’ स्थानकांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची मोठी महत्वाची भूमिका आहे. त्यातही लोकल म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी. शासनामार्फत लोकलचा विस्तार केला जातो आहे . मात्र तरीही लोकलची गर्दी काही कमी होत नाही. मात्र मुंबईकरांना मेट्रो मोठीच दिलासादायक ठरताना दिसत आहे. लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणे पसंत करीत असल्याचे पाहायला मिळते. त्यादृष्टीने आता मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत आहे.

मेट्रो ३ चा पहिला टप्पा काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याचबरोबर मेट्रो ९ चा पहिला टप्पा देखील या वर्षाच्या अखेर प्रवाशांच्या सेवेत येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा (Mumbai Metro) मिळणार आहे.

जलद गतीने प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार दहिसर मीरा-भाईंदरला जोडणारा मेट्रो 9 चा पहिला टप्पा या डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर काशीगाव ते नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी डिसेंबरला (Mumbai Metro) खुला होण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. आणि आता मेट्रोचा 87% काम पूर्ण झाले आहे. तर दोन टप्प्यात ही मेट्रो सेवा सुरू होणार असून पहिला टप्पा हा दहिसर ते काशिमिरा या दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत ही मेट्रो धावणार असल्याचं बोललं जात आहे. या मेट्रो सेवेत मुळे थेट नागरिकांना गुंदवली -अंधेरी ते मीरा-भाईंदर मधील काशीमारा दरम्यानचा प्रवास जलद (Mumbai Metro) गतीने करता येणार आहे.

कशी असेल मार्गीका? (Mumbai Metro)

मेट्रो 9 ही मुंबई उपनगर आणि मीरा-भाईंदर ला जोडणार असून , १०. ८ किलोमीटरची ही मार्गिका असेल. यामध्ये आठ स्थानकांचा समावेश असेल. पहिलया चार स्थानकांमध्ये दहिसर,पांडुरंग वाडी, मीरा गाव आणि काशिगाव तर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो सेवा पुढील वर्षी सुरु करण्यात येणार आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर नक्कीच लोकलचा भार मात्र हलका होणार आहे.