Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक चांगली बातमी असून मुंबई मेट्रो आता नव्या मार्गिकेवरून धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो 11 ही भायखळा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट या गर्दीच्या परिसरामधून धावणार असल्याची माहिती एका इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे. या नव्या (Mumbai Metro) मार्गिकेमध्ये कोणती नवी स्थानके येतील ? आणि याचा कोणाला फायदा होणार आहे चला पाहूया…
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नव्या संरेखनाची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. या नव्या मार्गिकेमुळे कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत सीएसएमटी येथे पोहोचता येणार आहे. यासाठीच वडाळा ते सीएसएमटी मेट्रो 11 मार्गिका प्रस्तावित (Mumbai Metro) करण्यात आली होती.
गर्दीच्या भागातून धावणार मेट्रो
यापूर्वी मेट्रो 21 मार्गिकेची लांबी 12.7 किमी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, आता सरेखनात योग्य मजुरी मिळाल्यामुळे या मेट्रो मार्गिकेची लांबी आता 28 किमी असेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ही मेट्रो गर्दीच्या भागातून धावणार आहे. त्या दृष्टीने या नव्या संरेखनातील संपूर्ण 18 किमी मार्गावर जिओ टेक्निकल (Mumbai Metro) तपासणी सुरू केली जाणार आहे. यामुळे आता प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.
कोणत्या भागांचा समावेश
आणिक बस डेपो, वडाळा डेपो, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हाय बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केड, सीएसएमटी, हार्मोनियम सर्कल, कुलाबा या भागातून मेट्रो धावणार आहे.