Mumbai Metro : मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावणार; गणेशोत्सवानिमित्त MMRDA चा निर्णय

Mumbai Metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro । मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावणार आहे. गणेशभक्ताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा आणि उशीर झाला तरी घरी व्यवस्थित जाता यावे यासाठी MMRDA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक उत्सव नाही तर शहरातील सर्वात व्यस्त प्रवास कालावधींपैकी एक आहे. या काळात मेट्रोच्या फेऱ्या वाढवून जागतिक दर्जाची शहरी गतिशीलता प्रदान करणे महत्वाचं आहे असं अधिकाऱ्यांनी म्हंटल.

कोणत्या मेट्रो 12 पर्यंत धावणार – Mumbai Metro

Metro Line 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि Metro Line 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील गाड्या रात्री 11:00 ऐवजी 12:00 वाजेपर्यंत धावणार आहेत. मेट्रोची ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 11 दिवसांसाठी उपलब्ध असेल. या ११ दिवसात मुंबईकर वेगवेगळ्या मंडळाचे गणपती बघायला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात. परिणामी घरी परत जाताना रेल्वे आणि बस मध्ये मोठी गर्दी बघायला मिळते. अशावेळी गणेशभक्तांना या काळात रात्री उशिरापर्यंत सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी MMRDA ने हा निर्णय घेतला आहे.

अधिकाऱ्यांनी म्हंटल कि, गणेशोत्सवाच्या काळात भाविकांचा प्रवास सोप्पा करण्यासाठी आणि भाविकांना रात्री उशिरा प्रवासासाठी सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी मेट्रोने (Mumbai Metro) हे पाऊल उचललं आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान, ३१७ सेवा सुरू होतील, ज्यामध्ये गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी आणि गर्दी नसलेल्या वेळी ९ मिनिटे ३० सेकंदांनी मेट्रो धावतील. शनिवारी २५६ मेट्रो धावतील. Peak hours मध्ये दर 8 मिनिटांनी मेट्रो धावेल तर Non-peak hours मध्ये दर 10 मिनिटे 25 सेकंदांनी मेट्रो धावतांना दिसेल. तर रविवारी २२९ मेट्रो सेवेत असतील. या ट्रेन दर 10 मिनिटांनी धावतील. गर्दी हाताळण्यासाठी गरज पडल्यास अतिरिक्त गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोनेही रात्रीच्या मेट्रो वेळेत मोठा बदल केला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 06 सप्टेंबरला सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सेवा 41 तास अखंड मेट्रो सुरू राहणार आहे. तर 27 ते 29 ऑगस्ट या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील, तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, या विशेष सोयीचा लाभ घ्यावा, गर्दी टाळून सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा.