Mumbai Metro : राज्यामध्ये विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते प्रकल्प, पूल बांधणी, याशिवाय मेट्रोच्या बांधकामाचा देखील समावेश करण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे ही राज्यातली दोन महत्त्वाची शहरं एकमेकांना जोडण्यासाठी या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी (Mumbai Metro) वाढण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची काम प्रगतीपथावर आहेत.
राज्यातील पहिला डबल डेकर पूल
मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामध्ये अत्याधुनिक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अनेक प्रकारचे पूल या मार्गावर उभारण्यात येत आहेत. याच प्रकारे जर आपण वसईतील मेट्रो मार्गाचा विचार केला तर (Mumbai Metro) या मार्गावर भाईंदर खाडीमध्ये राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार केला जाणार असून या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खांबावर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पूल असणार आहे. राज्यातील हा पहिलाच अशा प्रकारचा पूल असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एम एम आर डी सी च्या माध्यमातून याला मान्यता देण्यात आली असून आता वसई मधील मेट्रो मार्गाचा खर्च देखील कमी होणार आहे. वसई मेट्रो मार्गाचा विचार करता वसई शहरांमध्ये मेट्रो यावी याकरिता मेट्रोमार्ग 13 ची घोषणा करण्यात आली होती. तेव्हाच मीरा भाईंदर ते वसई विरार (Mumbai Metro) हा मेट्रोमार्ग एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रोमार्ग असून त्यामध्ये 20 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
वसई आणि विरार शहरासाठी मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळालेली असली तरी या मार्गात खाडी असल्यामुळे मेट्रो नेमकी कुठून आणायची? असा मोठा प्रश्न होता याकरता अनेक पर्यायांची चाचपणी करण्यात आली. इतर पर्यायी मार्ग हे खर्चिक आणि वेळ खाऊ असल्यामुळे ते टाळून भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलावरून मेट्रो आणावी असा प्रस्ताव आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिला होता. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आमदार क्षितिष ठाकूर आणि आमदारा राजेश पाटील (Mumbai Metro) यांनी केला होता व अखेर एमएमआरडीसीच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सध्या भाईंदर नायगाव मेट्रोसहित खाडीपूल उभारण्याबाबतचा आराखडा तयारीचे काम सुरू असून या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.
मीरा-भाईंदर या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे काम चालू असून त्याच मार्गाला हा वसई विरार मेट्रोमार्ग जोडला जाणार आहे. या मार्गावर भाईंदर खाडीत आता हा प्रस्तावित फुल आणि मेट्रो एकाच ठिकाणाहून जाणार आहे. पुलावर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल असणार अशी रचना करण्यात येणार असून एकाच खांबावर हे दोन्ही मार्ग असणार आहेत त्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात देखील बचत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल (Mumbai Metro) कार्पोरेशन ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.