Mumbai Metro : मुंबईतील भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर मध्ये होणार खुला ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर असून मुंबई मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानचा दहा स्थानकाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो 3 ची सेवा सप्टेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये पसरवलं जात आहे.

त्यातच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून 33.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला असून या मार्गिकेवर 69 स्थानक आहेत. पहिल्या टप्प्यात मात्र दहा स्थानकांमधून मेट्रो धावण्याची माहिती आहे. बीकेसी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात दहा स्थानके असणार आहेत. या मेट्रोचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्थानके 22 ते 28 मीटर जमिनीखाली असून मुंबई (Mumbai Metro) विमानतळा जवळील सहार रोड टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी करून घेतली आहे. मेट्रोच्या ट्रायल रन देखील झालया आहेत. संपूर्ण 33 किलोमीटर भुयारी मार्ग पुढच्या वर्षी सुरु (Mumbai Metro) होण्याची शक्यता आहे. तर पहिला टप्पा पुढील महिन्यात खुला केला जाऊ शकतो. सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तर सध्या मेट्रो मार्गीकेवरील टर्मिनल एक आणि टर्मिनल दोन स्थानकांच्या फिनिशिंगचे काम सुरू आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो 3 मार्गावर कोणत्या स्थानकांचा समावेश (Mumbai Metro)

मुंबई मेट्रो 3 मार्गावर विधान भवन, कप परेड, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो ,काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ ,आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ, असतील यापैकी आरे सोडून सर्व स्थानके भूमिगत आहेत.

तर मुंबई मेट्रो तीनच्या पहिला टप्पा जो खुला केला जाईल यामध्ये दहा स्थानक कोणती आहेत ते आता पाहूयात या दहाच स्थानकांमध्ये आरे, सिप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल दोन, (Mumbai Metro)सहार रोड ,विमानतळ, टर्मिनल एक, सांताक्रुज, विद्यानगरी आणि बीकेसी या दहा स्थानकांचा यामध्ये समावेश असणार आहे.