हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक – २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी पार पडणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १०% सवलत (Mumbai Metro Ticket Discount) मिळणार आहे. ही सवलत मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे.
पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांसाठी 20 मे रोजी मतदान होईल. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10% सवलत मिळणार (Mumbai Metro Ticket Discount) आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांसाठी हि मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे. त्यानुसार आता या उपक्रमाच्या अंतर्गत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता येणार आहे.
MMRDA ने का घेतला निर्णय- Mumbai Metro Ticket Discount
लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरीता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तृत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग (SVEEP) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे.मेट्रोच्या या निर्णयामुळे मुंबईतील मतदानाचा टक्का वाढतो का ते पाहावं लागेल. कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रात २ टप्प्यात मतदान झालं असून मतदानाचा टक्का चांगलाच घसरला आहे.