Mumbai Mhada : सावधान ! म्हाडाच्या सोडतीसाठी बनावट संकेस्थळ ; कसा ओळखाल नेमका फरक ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Mhada : मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा ही संस्था प्रचलित आहे. अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट बघत असतात.

नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळासाठीची सोडत जाहीर करण्यात आली असून 9 ऑगस्ट पासून याची अर्ज विक्री सुरू करण्यात आली आहे. म्हाडाची ही घर खरेदी करण्यासाठी तुम्ही संकेतस्थळावरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मात्र तुम्ही असे करत असाल तर थांबा ! कारण सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ (Mumbai Mhada) तयार करून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची बाब समोर आली आहे

म्हाडा कडून ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली असल्यामुळे आपण घरच्या घरी अर्ज करू शकता आणि याच कारणामुळे अनेक जण म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याला प्राथमिकता देत आहेत. मात्र एक बनावट संकेतस्थळ सुद्धा तयार करण्यात आले असून याद्वारे फसवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई मंडळाच्या सोडतीची (Mumbai Mhada) इत्यंभूत माहिती या बनावट संकेतस्थळावर देण्यात आली असून अर्जाची अनामत रक्कमही या संकेतस्थळावरून अदा करून घेतली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्राधिकरणाकडून घेण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 9 ऑगस्ट पासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Mumbai Mhada) अशातच म्हाडाचे संकेतस्थळ संत गतीने सुरू असल्याने इच्छुक अर्जदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच म्हाडाच्या सोडतीच्या संकेतस्थळाचे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या संकेतस्थळावरून अर्ज भरून घेतले जात आहेत इतकेच नव्हे तर अर्जाबरोबर अनामत रक्कमही भरून घेण्यात येत आहे. याबाबत मुंबई मंडळाकडे एक तक्रार आल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहेत आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

कसे ओळखाल बनवट संकेतस्थळ ? (Mumbai Mhada)

आता प्रश्न असा उरतो की बनावट संकेतस्थळ आणि म्हाडाचे खरे संकेतस्थळ हे कसे ओळखावे? तर म्हाडा प्राधिकरणाने mhada. Gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज आणि अनामत रक्कम भरावी असं आवाहन केलं आहे तर mhada. Org हे बनावट संकेतस्थळ असून अशा व इतर संकेतस्थळावर अर्ज भरू नये तसेच अनामत रक्कमही भरू नये असं आवाहन म्हाडा कडून (Mumbai Mhada) करण्यात आले आहे.