Mumbai Mhada : PM आवास योजनेतील घरांच्या किंमतीत वाढ ; मात्र ‘या’ सोसायट्यांना म्हाडा कडून बगल ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Mhada : मुंबईत सध्याच्या घडीला घर घेणे म्हणजे खूप जोखमीचे झाले आहे. कारण मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत मुंबईत घर घेणाऱ्यांकरिता आशेचा किरण म्हणजे म्हाडाची सोडत. म्हाडामधून कमी किमतीत घरं उपलब्ध करून दिली जातात. यावर्षीची मुंबई येथील सोडत अवघ्या काही दिवसांत निघण्याची शक्यता आहे. ही सोडत दोन हजार घरांसाठी असेल असे सांगण्यात येत आहे. मात्र कमी किमतीतल्या घरांच्या ऐवजी म्हाडाची घरे महागली आहेत का ? शिवाय कमी उत्पन्न असलेल्या घरांच्या किंमतीत वाढ आणि पॉश घरांच्या किंमती मात्र जैसे थे असल्याचा (Mumbai Mhada) असा सवाल ‘सामना’ मधून उपस्थित करण्यात आलाय…

यंदाच्या म्हाडाच्या लॉटरी मध्ये मागील लॉटरी मधील शिल्लक घरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील शिल्लक घरांच्या किमती यंदा सव्वा चार लाख रुपयांनी मागणार आहेत. तर कन्नमवार नगर मधील अत्यल्प गटाच्या घरांसाठी देखील लाखभर रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जुहू आणि ताडदेव मधील पॉश घरांच्या किमती गतवर्षी एवढीच (Mumbai Mhada) असल्याची माहिती सूत्राने दिली असल्याचा वृत्तपत्रातून मध्ये म्हंटले आहे.

यावर्षी ‘या’ भागातील घरांचा समावेश (Mumbai Mhada)

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाला मुंबईतील 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 1947 घरांचा समावेश होता यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा तर्फे गोरेगाव, विक्रोळी, पवई, ताडदेव, जुहू येथील दोन हजार घरांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. गतवर्षीच्या लॉटरीतील शिल्लक घरांचा म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरांचाही या लॉटरीमध्ये समावेश (Mumbai Mhada) असणार आहे.

घरांच्या किंमतीत वाढ का? (Mumbai Mhada)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हाडाच्या किमतीबद्दल वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी गुंतवलेल्या भाग भांडवला वरील व्याजांमुळे गतवर्षीच्या लॉटरीच्या तुलनेत यंदाच्या लॉटरी शिल्लक करांच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील जवळपास 88 घर शिल्लक आहेत. मागील वर्षी या घरांची किंमत 30 लाख 44 हजार रुपये होती तर आता या घरांची किंमत अंदाज 34 लाख 70 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर उत्पन्नाची मर्यादा देखील आता तीन लाखांवरून सहा लाख रुपये केले आहे.
विक्रोळी आणि कन्नमवार नगर मधील 34 लाख 74 हजार रुपयांच्या घरांसाठी यंदा अंदाजे 35 लाख 82 हजार रुपये आकारले जाणार (Mumbai Mhada) असल्याचे बोलले जात आहे.

पॉश घरांच्या किमती मात्र जैसे थे ? (Mumbai Mhada)

मात्र दुसऱ्या बाजूला ताडदेवच्या क्रिसेंट टॉवर आणि जुहूच्या विक्रांत सोसायटीतील आलिशान घराच्या किमती म्हाडा ने तशाच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी क्रिसेंट टॉवर मधील घरांसाठी सात कोटी 57 लाख आणि विक्रांत सोसायटीमधील घरासाठी चार कोटी 87 लाख रुपये किमती असणार आहेत. मग एकीकडे आवास योजनेतील घरांसाठी किमती वाढवण्यात येतात आणि दुसरीकडे पॉश आणि श्रीमंतांच्या घरांच्या किमतीमध्ये वाढ नाही. असा फरक का ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.