Mumbai News : मुंबई म्हणजे गर्दीचे ठिकाण हे आपल्याला काही नवे सांगायला नको. मुंबईत विमानतळावरून उतरले की कॅब बुक करणे आणि ती मिळेपर्यन्त वाट पाहणे म्हणजे मोठी मुश्किल असते. शिवाय कॅब चालकांकडून भरमसाठ भाडेही आकारले जाते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. कॅब बुक करणे आणि त्याची वाट पाहण्याच्या काटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. कारण BEST कडून (Mumbai News) एका खास AC बसची सोय करण्यात आली आहे.
बेस्टची एसी बस सेवा ‘चलो बस’
आता प्रवासी मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वीच त्यांच्या मोबाईलच्या मदतीने त्यांच्या सोयीनुसार मार्गावरील एसी बसमध्ये स्वतःसाठी जागा बुक करू शकतात. मुंबई विमानतळाला शहराच्या इतर भागांशी जोडणारी बेस्टची एसी बस सेवा ‘चलो बस’ सुरू झाली आहे. ही बस सेवा प्रामुख्याने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 (T2) वरून उपलब्ध आहे. बेस्टची एसी बस सेवा ‘चलो बस’ या वर्षी (Mumbai News) जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही बस सेवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 ते शहरातील प्रमुख ठिकाणी पुरवली जाते.
24 तास सेवा उपलब्ध
ही बस सेवा आठवड्याचे सातही दिवस 24 तास उपलब्ध आहे. बेस्टच्या चलो ॲपद्वारे प्रवासी या बसमध्ये (Mumbai News) त्यांची जागा बुक करू शकतात. प्रवाशांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बससाठी प्रवासी किमान ७ दिवस अगोदर त्यांची जागा बुक करू शकतात.
काय आहे खासियत ? (Mumbai News)
ही एक लक्झरी विमानतळ बस सेवा आहे, त्यातील सर्व बस इलेक्ट्रिक बस आहेत. बसमध्ये सामान ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा देण्यात आली आहे. आरामदायी आसन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी यूएसबी पोर्टची सुविधा आहे. आरामदायी प्रवासामुळे लांबच्या विमान प्रवासाचा थकवा यामुळे कमी होईल यात शंका नाही.