Mumbai News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने MMR च्या विकासासाठी एक व्यापक योजना तयार केली आहे. मुंबईच्या धर्तीवर संपूर्ण MMR ला जागतिक दर्जाचे बनविण्याचा हा प्लान तयार करून MMRDA ने तो नीती आयोगाला सादर केला आहे. या योजनेंतर्गत MMR मधील विविध क्षेत्रांच्या वैशिष्ट्यांनुसार सात ठिकाणी ग्रोथ हब तयार करण्याचा मानस आहे.
MMR च्या प्रमुख 9 वैशिष्ट्यांचा विचार करून त्याचा विकास करण्यात येणार आहे – वित्तीय राजधानी, बंदर, मॅन्युफॅक्चरिंग हब, ग्लोबल कनेक्ट, डोमेस्टिक कनेक्ट, मनोरंजन राजधानी, किनारी भाग, रोजगार बाजार आणि ऐतिहासिक महत्त्व. योजनेत बीकेसीच्या 30 हेक्टर परिसरात वर्ल्ड क्लास बिझनेस हब, वडाळ्याच्या 20 हेक्टर भागात फायनान्स सेंटर आणि खारघर येथे कॉर्पोरेट पार्क उभारण्याची योजना आहे. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 250 हेक्टर जमिनीचे पुनर्विकसन होणार आहे.
रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार (Mumbai News)
MMR च्या महत्वाला अनुसरून ग्लोबल सर्व्हिस हब तयार करण्याची योजना आहे. यामध्ये फायनान्स सर्व्हिस, न्यू एज सर्व्हिसेस, हेल्थकेअर, शिक्षण, एव्हिएशन, मीडिया, ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर आणि डेटा सेंटर उभारले जातील. या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
10 लाख घरं कमी उत्पन्न गटासाठी तयार होणार
विकास योजनांसह झोपडपट्टी मुक्त परिसर उभारण्यासाठी 30 लाख परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत. यामध्ये 22 लाख झोपड्यांचे पुनर्विकसन आणि 10 लाख घरं कमी उत्पन्न गटासाठी तयार करण्याचा (Mumbai News) निर्णय घेण्यात आला आहे.
टुरिझम हब म्हणून विकास (Mumbai News)
MMR ला ग्लोबल टुरिझम हब म्हणूनही विकसित करण्याचा विचार आहे. सध्या MMR मध्ये दोन मोठी बंदरं आहेत, तर पालघर येथे देशातील सर्वात मोठं बंदर उभारलं जात आहे. त्यासोबतच 11,000 हेक्टर क्षेत्रावर नवी औद्योगिक नगरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. जलमार्गाद्वारे येणाऱ्या मालाच्या वाहतुकीसाठी चार सुपर लार्ज लॉजिस्टिक क्लस्टर उभारण्याची योजना आहे.
19 नियोजित शहरे उभारली जातील
MMR चा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांचा मोठा वाटा असेल. यासाठी मेट्रो, नवीन रस्ते आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी विकसित करण्याचा मानस आहे. तसेच नागरिकांसाठी दर्जेदार निवास व्यवस्था उभारण्यासाठी 19 नियोजित शहरे तयार केली जातील.
MMR डेव्हलपमेंट प्लानच्या मुख्य बाबी
07 ठिकाणी ग्रोथ हब तयार करण्याची योजना
11,000 हेक्टरवर नवी औद्योगिक नगरी उभारली जाणार
19 नियोजित शहरे तयार करून दर्जेदार निवास व्यवस्था
30 लाख परवडणारी घरे तयार करण्याची योजना
बीकेसीच्या 30 हेक्टर परिसरात वर्ल्ड क्लास बिझनेस हब
वडाळ्याच्या 20 हेक्टर परिसरात फायनान्स सेंटर
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 250 हेक्टर जमिनीचे पुनर्विकसन
MMRDA च्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे MMR जागतिक दर्जाच्या विकासासाठी नवा आदर्श निर्माण करेल.