Mumbai News : अप्रतिम अभिनयाने आपली वेगळीच छाप सोडणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 80 -90 चे दशक अक्षरश: श्रेदेवी यांनी गाजवले. त्या काळात त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या. ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’ ‘लाडला’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ ते अगदी ‘इंग्लिश विंग्लिश ‘ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. आजही त्या आपल्यात नाहीत ही न पटणारी गोष्ट वाटते. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचे दुबईत निधन झाले. आता श्रीदेवी यांचे नाव मुंबईतल्या (Mumbai News) एका चौकाला दिले असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , श्रीदेवी यांनी केलेल्या कामासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बृहन्मुंबई नगर (Mumbai News) निगमनं लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. बीएमसीने लोखंडवाला कॉम्प्लॅक्समधील एका विशिष्ट चौकाला ‘श्रीदेवी कपूर चौक’ ठेवले आहे. हे श्रीदेवी यांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे. खरंतर ही मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकाचे नाव श्रीदेवी कपूर ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण श्रीदेवी या इथल्याच ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्यांचे पार्थीव देखील त्याच ठिकाणाहून नेण्यात आले होते.
आणि बायोपिकला मिळाला पूर्णविराम (Mumbai News)
दरम्यान श्रीदेवी यांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर आधारित बायोपिक बनवण्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र त्यांचे पती बोनी कपूर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ती एक खासगी व्यक्ती होती आणि त्याप्रमाणेच तिचे आयुष्य हे खासगी राहायला हवं. या कारणामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही”. त्यामुळे बायोपिकच्या चर्चाना पूर्णविराम मिळला. मात्र आता मुंबईतल्या (Mumbai News) चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
यापूर्वी अनेक ठिकाणांना कलाकारांची नावे (Mumbai News)
एखाद्या चौकाला किंवा भागाला कलाकारांचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सिक्किममध्ये एक वॉटरफॉल आहे. त्याचं नाव ‘बिग बी’ असं आहे. त्याशिवाय सिंगापुरच्या एका आर्किडचं नाव ‘डेंड्रोबिम अमिताभ बच्चन’ असं आहे. कॅनडाच्या एक रस्त्याचं (Mumbai News) नाव ‘राज कपूर क्रेसेन्ट’ असे आहे.