Mumbai News : मुंबई पोलिसाना पुन्हा एकदा धमकीचा कॉल आला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात शस्त्रे घेऊन काही दहशतवादी घुसलेत असा दावा सदर कॉल वर करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र नेहमीप्रमाणे हा एक फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी सुद्धा मागील काही महिन्यांपासून मुंबई पोलिसाना असे अनेक धमकीचे कॉल आले होते.
काल रात्री मुंबई पोलीस (Mumbai Police) कंट्रोलला धमकीचा फोन आला. कॉलरने नियंत्रण कक्षाला सांगितले की शस्त्रे घेऊन काही दहशतवादी मुंबईच्या डोंगरी भागात घुसले आहेत आणि त्यांना पोलिसांच्या मदतीची गरज आहे. हा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Maharashtra | Mumbai Police Control received a threatening call. The caller told the control room that some terrorists armed with weapons had entered the Dongri area of Mumbai, and they needed police assistance. As soon as the police started an investigation after receiving this…
— ANI (@ANI) February 16, 2024
यापूर्वी सुद्धा अनेकदा धमकीचे कॉल – Mumbai News
यापूर्वी अनेकदा मुंबई पोलिसाना अशाच प्रकारे धमकीचा आणि मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा कॉल किंवा इ मेल आले होते. पोलीस यंत्रणा प्रत्येकी वेळी अलर्ट मोडवर होती, मात्र प्रत्येक वेळी हे कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झालं होत. परंतु मुंबई पोलीस वेळोवेळी सतर्क राहते आणि परिस्थिती गांभीर्याने घेत असते.