Mumbai : आर्थिक राजधानी, कधीही न झोपणारे शहर, गरीब श्रीमंत सगळ्यांना सामावून घेणारं शहर म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो. याच मुंबईच्या मुकुटात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चीनचे महानगर बीजिंगला मागे टाकत मुंबई प्रथमच आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. एका ताज्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. बीजिंगच्या 16,000 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक अब्जाधीश आता मुंबईच्या (Mumbai) 603 चौरस किलोमीटरमध्ये राहतात.
न्यूयॉर्क आणि लंडननंतर मुंबईचा जगात तिसरा क्रमांक (Mumbai)
जागतिक स्तरावर या यादीत मुंबई आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे, येथे 119 अब्जाधीश राहतात, तर लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे 97 लोक अब्जाधीश आहेत. अब्जाधीश असे लोक आहेत ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 8,333 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
26 नवीन अब्जाधीशांची भर(Mumbai)
मुंबईने एका वर्षात 26 नवीन अब्जाधीशांची भर घालून चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून बीजिंगला मागे टाकले आहे. त्याच वेळी, बीजिंगने 18 माजी अब्जाधीशांना निव्वळ आधारावर यादीतून काढून टाकले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय अब्जाधीशांच्या जागतिक क्रमवारीत थोडीशी घसरण झाली आहे. मुकेश अंबानी यांनी संपत्तीत भरीव वाढ करून दहावे स्थान कायम ठेवले आहे. त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांना जागतिक स्तरावर आठ स्थानांनी 15व्या स्थानावर नेले (Mumbai) आहे.हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2024 नुसार, मुंबईने भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीनुसार मुंबईत तब्बल 93 अब्जाधीश राहतात.
भारतातील टॉप टेन अब्जजाधीश
- गौतम अदानी- भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर
- एचसीएलचे शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर
- चौथ्या क्रमांकावर सिरम इंस्टीट्यूटचे सायरस पूनावाला
- पाचव्या क्रमांकावर सन फार्माचे दिलीप सांघवी
- सहाव्या स्थानावर आदित्य बिर्ला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला
- सातव्या स्थानावर हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा
- त्यानंतर आठव्या क्रमांकावर डिमार्टची मुख्य कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टचे मालक राधाकिशन दमानी
- नवव्या स्थानावर विप्रोचे अझीम प्रेमजी
- बजाज उद्योगसमुहाचे निरज बजाज यांचा दहावा क्रमांक