Mumbai Parking Lot: मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे पार्किंगची मोठी समस्या उद्भवते. परिणामी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पण आता पार्कींगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून एक ऍप विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. चला जाणून घेऊया (Mumbai Parking Lot) त्याबद्दल…
सध्याच्या घडीला मुंबईत वाहनांची संख्या ४८ लाखांहून अधिक झाली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या २९ लाख आहे. बीएमसीच्या पुढाकारामुळे लवकरच वाहनधारकांना मुंबईतील सर्व पार्किंग लॉट्सची रिअल-टाइम माहिती मिळणे आणि ऑनलाइन पेमेंटद्वारे कुठेही जागा बुक करणे शक्य होणार आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्मार्ट इंटिग्रेटेड पार्किंग सिस्टिमची निविदा (Mumbai Parking Lot) अंतिम केली जाणार आहे.
शुल्क आकारून वाहनतळ सुविधा (Mumbai Parking Lot)
सध्याचा विचार करता मुंबईतील 24 पैकी काही वॉर्डमध्ये शुल्क आकारून वाहन तळांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. साधा मुंबईत 98 रस्त्यांवर वाहन तळांची सुविधा असून 35 पब्लिक पार्किंग लॉट आहेत. याशिवाय पाच बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ उपलब्ध होणार असून त्यावर काम सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून आणखी नवीन वाहनतळांचा शोध घेण्यात आला. जवळपास 3000 जागा पार्किंगसाठी शोधण्यात आल्या आहेत आणि तशी माहिती महापालिकेला वाहतूक पोलिसांना देत ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केलाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेला 500 पेक्षा अधिक वाहनताळांसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती आहे.
मोबाईल पार्किंग ॲप (Mumbai Parking Lot)
मुंबई महापालिका मोबाईल पार्किंग ॲप विकसित करत असून जुन्या वाहन तळांबरोबरच नवीन वाहन तळही महापालिकेने या ॲप साठी जोडण्याचे नियोजन केले आहे. सरकारी खाजगी कार्यालयांच्या जागेबरोबरच निवासी सोसायटीच्या जागेत तसंच रस्त्यांवर वाहनांना वाहन तळ आहे की नाही ते मोबाईल ॲप द्वारे समजणार आहे. त्यामुळे आता पार्किंग कुठे करायचं? ही समस्या राहणार नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पार्किंगची सुविधा कुठे आहे हे कळणार आहे. विशेष म्हणजे याचे दरही निश्चित केले जाणार असून महापालिकेला यातून मोठा महसूल मिळणार (Mumbai Parking Lot) आहे.
ॲप साठी निविदा (Mumbai Parking Lot)
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका वाहन तळांच्या उपलब्धतेबाबत मोबाईल ॲप विकसित करत आहे, त्यासाठी जानेवारी 2024 नंतर हार्डवेअर कामांसाठी निविदा काढली असता त्याकडेही कंत्राटदारांनी पाठ फिरवली. हार्डवेअर कामांसाठी दोन वेळा काढलेल्या निविदांना प्रतिसादच मिळाला नाही. सॉफ्टवेअरच्या कामासाठी काढलेल्या निविदांनाही अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी या कामाची निविदा काढून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेचे हे मोबाईल ॲप सुरू होणार का आणि मुंबईकरांची पार्किंगची समस्या दूर होणार का ? आता आहे येणारा काळच ठरवेल.