मुंबई । ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच मुंबईतील एका पोलीस कॉन्स्टेबलला प्राण गमवावे लागले आहेत. मृत पोलीस कॉन्स्टेबल हे ५५ वर्षांचे होते. विलेपार्ले पोलीस ठाण्यात ते नेमणुकीला होते. गुरुवारी त्यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर ९ मेपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आता मुंबई पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ११वर पोहोचली आहे.
कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असलेल्या राज्यातील पोलीस दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, आता मृत्यूचा आकडाही वाढत आहे. दरम्यान, काल दुपारी ठाणे पोलीस दलातील एका कोरोनाबाधित महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात त्या पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या.
१९ मे रोजी या महिला पोलीस कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोनाशी झुंज देत असताना काल दुपारीच साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”