TRP घोटाळा: रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ, मुंबई क्राईम ब्रांचकडून आणखी 6 जणांना समन्स जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । टीआरपी घोटाळा प्रकरणी (TRP Scam)रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आलं असताना तसंच मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेलं असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी घोटाळा प्रकरणी आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. (Mumbai Police Summons 6 Republic tv senior person) रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना तर हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा उद्या (शनिवारी) या 6 जणांची चौकशी करणार आहे. विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक), आणि घनश्याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस 5 जणांची चौकशी करणार होते. शिवा सुब्रम्हणयम, आईएफवो, रिपब्लिक चॅनेल, सॅम बलसारा, चेअरमन, मॅडसन जाहिरात कंपनी, शशी सिन्हा , लिंटास जाहिरात कंपनी, फक्त मराठी चॅनेलचे सी इ ओ आणि बॉक्स चॅनेलचे सीइओ यांची चौकशी होणार होती. मात्र, आजच्या चौकशीला केवळ मॅडसन कंपन चे मालक सॅम बालसारा आणि लिंटासचे शशी सिन्हा हे दोघेच हजर होते. बाकी सर्वांनी आपण बाहेर आहोत, असं सांगून चौकशीला दांडी मारली. सुमारे सात तासाच्या चौकशीनंतर त्या दोघांना सोडून देण्यात आलं.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली आहे. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं आहे.यामुळे पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलवर कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यानुसार रिपब्लिक चॅनेलचं सी एफ वो शिवा सुब्रम्हणयम यांना आज क्राईम ब्रांच च्या अधिकाऱ्यांनी चौकशी साठी बोलावलं होतं.मात्र,त्या आधीच रिपब्लिक चॅनेलने सकाळीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

रिपब्लिक चॅनेलने घटनेच्या कलम 32 नुसार याचिका केली आहे. त्याचा क्रमांक 7848/2020 असा आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. यामुळे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने आपण तपासाची घाई करू नये, अस शिवा सुब्रम्हणयम यांनी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Mumbai Police Summons 6 Republic senior person)

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment