Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे 10 पदरी होणार; काय आहे सरकारचा प्लॅन

Mumbai Pune Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे महामार्गावरून (Mumbai Pune Expressway) सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर मुंबई आणि पुणे हि महाराष्ट्रातील २ मोठी शहरे आहेत. दोन्ही ठिकाणी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने सतत या महामार्गावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. सध्या हा मार्ग ६ लेनचा असला तरी रस्त्यावरील एकूण गाड्यांची संख्या बघता मुंबई- पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषत: खंडाळा घाट ते खालापूर यादरम्यान वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आणि अतिरिक्त वेळही वाया जातो. मात्र आता यावर उपाय काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार, मुंबई-पुणे मागार्वरील ६ पदरी रस्ता आता १० पदरी करण्यात येणार आहे.

मुंबई ते पुणे हे अंतर जवळपास १५० किलोमीटर आहे. दररोज या महामार्गावरून 65 हजार पेक्षा जास्त वाहने धावतात. मात्र रस्ता कमी आणि गाड्या जास्त अशी एकूण परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडी हि याठिकाणी नित्याचीच ठरलेली आहे. त्यामुळे मुंबई- पुणे महामार्गावरी (Mumbai Pune Expressway) वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग १० लेनचा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे लवकरच हा द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला ये जा करणाऱ्या हजारो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

प्रकल्पाचा खर्च 14,900 कोटी रुपये- Mumbai Pune Expressway

या विस्ताराच्या सविस्तर योजनेचे सादरीकरण नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी तयारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आला आहे. हा विस्तार भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबई पुणे १० लेन महामार्ग प्रकल्पाचा खर्च साधारणपणे 14,900 कोटी रुपये आहे. त्याच्या आर्थिक आराखड्याचे काम सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण केला जाऊ शकतो असा दावा केला जातोय. सध्या मुंबई आणि पुणे दरम्यानच्या (Mumbai Pune Expressway) प्रवासास २ तास लागतात, मात्र शनिवारी आणि रविवारी म्हणजेच विकेंडला मात्र ३-४ तास वेळ लागतो. परंतु नवीन १० पदरी महामार्ग झाल्यास, मुंबई ते पुणे प्रवास सुपरफास्ट होणार आहे.