हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल तसेच हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. त्याअनुषंगाने तातडीने तपासाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विरोधकांनी राजकारण करु नये – संजय राऊत
या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, कारण अशा प्रकारच्या घटना या राज्याला मान खाली घालायला लावतात. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल . यासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारला अधिक कठोर पावलं उचलावी लागतील आणि ती उचलल्याशिवाय राहणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.