हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून , त्याला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच लोक शिक्षण , व्यवसाय आणि इतर कारणासाठी या ठिकाणी राहत असल्याचे दिसून येते . प्रवासाला लागणाऱ्या कालावधीमुळे कित्येक लोकांना आपल्या मूळ गावी जाण्याचा योगच येत नाही . त्यात दसरा आणि दिवाळी आली आहे . यासाठीच भारतीय रेल्वेने ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान CSMT लातूर आठवड्याला रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हि ट्रेन (Mumbai To Latur Train) प्रत्येक शनिवारी धावणार असून , ज्यामुळे मुंबई आणि लातूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ट्रेन थांबण्याची ठिकाणे –
19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2024 पासून मुंबई ते लातूर रेल्वे धावणार असून , ती प्रत्येक शनिवारी रात्री 12:30 मुंबईहून निघेल आणि सकाळी 11:40 पर्यंत लातूर मध्ये पोहचणार आहे. नंतर ती ट्रेन 4:30 वाजता लातूरहून निघून दुसऱ्या दिवशी 4:10 पोहचेल . या ट्रेनच्या जाण्याच्या आणि येण्याच्या प्रवासात ती दादर, ठाणे , कल्याण, लोणावळा , पुणे , उरुळी, दौंड , भिगवण,जेऊर, केम, कुर्डुवाडी, बारशी , उस्मानाबाद, हरंगुळ या ठिकाणी थांबणार आहे.
ट्रेनमधील सुविधा –
या ट्रेनमध्ये दोन AC-III टियर कोचची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाश्याना आरामदायी अनुभव मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना आठ स्लीपर क्लास कोच असणार आहेत. त्याचबरोबर या ट्रेनमध्ये आरक्षित सीट्स उपलब्ध असून , आठ सेकंड क्लास कोच उपलब्ध आहेत. काही सीट्स या आरक्षित नसून कोणत्याही प्रवाशाला बसता येईल. सुरक्षितता आणि सुरळीत कार्यासाठी दोन सीट्स गार्डसाठी असणार आहेत.
आरक्षण आणि बुकिंग –
हि सेवा कमी पैशामध्ये प्राप्त होणार आहे. तिकीट काढण्यासाठी मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून तिकीट बुक करता येईल . त्यासंदर्भात सर्व माहिती IRCTC वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध होईल. दुसरा पर्याय म्हणजे स्टेशनवर जाऊन तिकीट काढता येईल.