Mumbai To Nagpur Special Train : मुंबईवरून नागपूरसाठी सुरु होणार स्पेशल ट्रेन; कसा असेल रूट?

Mumbai To Nagpur Special Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Nagpur Special Train । महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई – नागपूर प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात म्हणजे दुर्गादेवी, दसरा, दिवाळी या काळात मुंबई वरून नागपूरला वाजणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, साहजिकच, जास्त प्रवासी एकाच वेळी प्रवासासाठी बाहेर पडल्याने गर्दी होते. गर्दीच्या संख्येनुसार, पुरेशी वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याचे प्रवाशांच्या प्रवासाचा खेळ खंडोबा होतो. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २५ सप्टेंबर पासून मुंबईतून नागपूरसाठी एक विशेष रेल्वे चालवली जाईल. या नव्या रेल्वेगाडीमुळे विदर्भवासीयांचा प्रवास आणखी सोप्पा, आरामदायी आणि जलद होण्यास मदत होणार आहे.

कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक? Mumbai To Nagpur Special Train

ट्रेन क्रमांक ०२१३९ हि २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वरून नागपूर असा प्रवास करेल. ही दिवाळी स्पेशल रेल्वे दर गुरुवारी मुंबईवरून मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०२१४० २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी नागपूरहून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी मुंबईत दाखल होईल (Mumbai To Nagpur Special Train) . हि स्पेशल ट्रेन ३ एसी ३-टायर, १० स्लीपर, ५ जनरल सेकंड क्लास, २ सेकंड सीटिंग आणि गार्ड-ब्रेक व्हॅनसह असेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

मुंबई ते नागपूर स्पेशल ट्रेन तिच्या प्रवासादरम्यान, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. Mumbai To Nagpur Special Train

पुणे नागपूर ट्रेनही धावणार –

मुंबईशिवाय मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात पुणे ते नागपूर अशी रेल्वेही सुरु करणार आहे. पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. या प्रवासादरम्यान, ती उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल.