Mumbai Traffic : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनके मोठे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी मुंबईत अनेक रस्त्यांची कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दक्षिण मुंबईचा पूर्व फ्री वे ते ग्रँटरोड. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा साडेपाच किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग मुंबई महापालेकडे कडून उभारला जाणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्यानंतर कुमार इन्फ्राची मुंबई महापालिकेने (Mumbai Traffic) या कामासाठी निवड केली आहे. हा महामार्ग कधी पूर्ण होणार ? असा सवाल असेल तर साडेतीन वर्षात हा मार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
केवळ 6-7 मिनिटांत पार होणार अंतर (Mumbai Traffic)
या मार्गाच्या बाबतीत सध्या पूर्व मुक्त मार्ग ते ग्रांट रोड स्थानक परिसर याची लांबी 5.56 किलोमीटर इतकी असून हा रस्ता पार (Mumbai Traffic) करण्यासाठी 30 ते 35 मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र हा जो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे तो पूर्ण झाल्यास केवळ सहा ते सात मिनिटात हे अंतर पार करता येणार आहे. हा मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळे (Mumbai Traffic) येत होते मात्र सर्व तांत्रिक समस्या आता सुटलया आहेत आणि त्यामुळेच मुंबई पालिकेने हा उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या होत्या त्यामध्ये कुमार इन्फ्राने सर्वात कमी बोली सादर केल्याने त्यांना हे काम देण्यात आल्याची माहिती आहे.
प्रकल्प खर्चाच्या किमतीत वाढ
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या कामात काही बदल करण्यात आल्यानं या मार्गाच्या (Mumbai Traffic) कामासाठी पूर्वी 662.42 कोटी रुपये खर्च येणार होता मात्र नव्या आराखड्यानुसार आता 1330 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा सांगितलं जात आहे. या उन्नत मार्गामुळे डॉक्टर बी आर आंबेडकर मार्ग रफी अहमद मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, ग्रँड रोड परिसर आणि मुंबई सेंट्रल या भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे.