Mumbai University | भारतातील सण उत्सव चालू असतानाच दिवाळीच्या आधी एक मोठी परीक्षा घेतली जाते. विद्यापीठाची सत्र परीक्षा ही हिवाळ्यामध्ये घेतली जाते. अशातच आता मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांच्या तारखा देखील विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राची परीक्षा 23 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यामध्ये बीकॉम, बीए, बीएससी यासह विविध परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहे. यामध्ये इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी या विद्याशाखांच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत कामाची बातमी आहे. कारण आता परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे त्यांना अभ्यासाला सुरुवात करावी लागेल.
हिवाळी सत्रासाठी आयोजित केलेल्या या परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बीकॉम, फायनान्शिअल मार्केट बँकिंग अँड इन्शुरन्स अकाउंटिंग आणि फायनान्स एमबीए या परीक्षा 23 ऑक्टोबर पासून आयोजित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे बीएच्या तृतीय वर्षाच्या सत्र पाचच्या परीक्षा या 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे एलएलबी तृतीय वर्षाच्या सत्र पाच आणि एलएलबी पाच वर्षाच्या परीक्षा 19 नोवेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत.
आता विद्यापीठाकडून या पदवी आणि पदवीधर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे. यामध्ये इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्या देखील परीक्षा होणार आहे. या परीक्षांच्या 26 तर वेळापत्रक तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता. विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यासोबत वेळापत्रक आणि परीक्षेचे शुल्क कधी भरायचे आहे. त्याच्या तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत. तसेच जर तुम्ही उशीर केला तर त्यानंतर तुम्हाला किती फी भरावी लागेल? याची माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आधी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.