हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Water Taxi। मागच्या काही वर्षात मुंबईतील कनेक्टीव्हीटी वाढवण्याचा प्रयत्न जोरदार सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास कमी वेळेत आणि आरामदायी व्हावा यासाठी सरकार कडून सातत्याने नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी मुंबईत मेट्रो सेवा करून करून लोकल रेल्वे वरील ताण कमी करण्यात आला. नवनवीन ब्रिज उभारून रस्ते वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्यात आला आहे. आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. सरकारने मुंबईत नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हि वॉटर टॅक्सी मुंबई आणि नवी मुंबईला जोडेल. गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अंतर या वॉटर टॅक्सी मुळे अवघ्या ४० मिनिटात पार करता येईल.
बंदरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर टॅक्सी सुरू करण्याच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत सोमवारी एक बैठक झाली. बैठकीदरम्यान, श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना वॉटर टॅक्सी सेवांसाठी नियोजन सुरू करण्याचे आणि आवश्यक ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले. गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टीपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी धावेल. रस्ते वाहतूक कोंडी कमी करणे, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान जलद, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम प्रवास पुरवणे हे यामागील उद्दिष्ट आहे. तसेच या वॉटर टॅक्सी मुळे इलेक्ट्रिक बोटी प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरणाला फायदा होण्यास मदत होईल.
कसा असेल रूट? Mumbai Water Taxi-
गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टीपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी (Mumbai Water Taxi) धावेल. रस्ते वाहतूक कोंडी कमी करणे, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान जलद, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम प्रवास पुरवणे हे यामागील उद्दिष्ट आहे. तसेच या वॉटर टॅक्सी मुळे इलेक्ट्रिक बोटी प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरणाला फायदा होण्यास मदत होईल. सध्याच्या घडीला मुंबईतून नवी मुंबईला जायचं असल्यास १ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक असल्याने प्रवासाचा फटका बसतो. मात्र आता वॉटर टॅक्सी सुरु झाल्यास मुंबईकरांना अवघ्या 40 मिनिटांत नवी मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे.
दरम्यान, काही वर्षापूर्वी गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा (Mumbai Water Taxi) सरू करण्यात आली होती. मात्र प्रवाशांच्या अल्पप्रतिसादामुळं ती कालांतराने बंद करण्यात आली. आता नवीन वॉटर टॅक्सी कधी पासून सुरु होते आणि प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे.




