मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ; ‘हा’ मॅचविनर गोलंदाज दुखापतग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्सने काल दिल्ली कॅपिटल्स संघाचा दणदणीत पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र मुंबई इंडियन्सच्या आनंदावर विरजण पडलं आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट जखमी झाला. बोल्टला ग्रोइंन इंजरी झाली आहे. त्यामुळे बोल्ट केवळ दोन ओव्हर टाकू शकला. दरम्यान 10 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याआधी बोल्ट फिट होणार का हे पाहावे लागणार आहे.

बोल्टनं १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या क्वालिफाय सामन्यातील पहिल्याच षटकांत बोल्टनं दिल्लीच्या दोन फलंदाजांना माघारी झाडलं होतं. बोल्टनं पहिल्याच षटकांत दिल्लीचं कंबरडं मोडलं होतं. त्याने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेला शून्य धावेवर बाद केले. यातून दिल्लीचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. या सामन्यात बोल्टला फक्त दोन षटके गोलंदाजी करता आली. त्यानंतर जखमी असल्यामुळे बोल्ट पुन्हा मैदानात परतलाच नाही. आयपीएलच्या १३ व्या हंगामात बोल्टला दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

श्रेत्ररक्षण करत असताना १४ व्या षटकांत groin injury मुळे बोल्ट मैदानाबाहेर गेला होता. फायनलपूर्वी बोल्ट जखमी झाल्यामुळे मुंबईसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा बोल्टच्या अंतिम सामन्यात खेळण्याबद्दल आशावादी आहे. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी बोल्टला पाहिले आहे. मला तो ठीक वाटला. मला नाही वाटत की बोल्टची दुखापत तेवढी मोठी आहे. दोन-तीन दिवसांची विश्रांती घेऊन तो नक्कीच परतेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment