अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील अतिक्रमनाच्या विळख्यात असलेलं धामणगाव रेल्वे शहरात अखेर गजराज फिरवुन अतिक्रमण काढणे मोहीम सुरू करण्यात आलीय. महानगरपालिकेने ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आहे.
अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होती. सद्या संपूर्ण शहरात रस्ता रुंदीकरण करणे सुरू असल्याने त्याचप्रमाणे वाहतुकीला अडखळा होऊ नये याकरिता नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आले.
धामणगाव रेल्वेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनं अतिक्रमण करून दुकानं थाटण्यात आली होती. याबाबत नगरपालिकेनं अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यामध्ये अनेक अवैध अतिक्रमणावर हातोडा फिरवण्यात आला. याशिवाय रस्त्यालगत असलेली दुकानेही हटविण्यात आली.
या मोहिमेत दुकानासमोरील टिन शेड ही जेसीबीच्या साहायानं तोडण्यात आली. मुख्य रस्त्यावर केलेल्या अतिक्रमण धारकांनी स्वतःन अतिक्रमण काढावे अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते. त्या नंतर ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेने मात्र शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.