मुरली श्रीशंकरने रचला इतिहास ! लांब उडीच्या प्रकारात फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू

0
46
murali sreeshankar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारताच्या मुरली श्रीशंकर (murali sreeshankar) याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला. अशी कामगिरी करणारा पहिला पुरूष भारतीय खेळाडू ठरत त्याने नवा इतिहास रचला आहे. मुरली श्रीशंकर (murali sreeshankar) आणि अविनाश साबळे यांनी अनुक्रमे पुरुषांच्या लांब उडी आणि 3000 मीटर स्टीपल चेसच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. या मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीशंकरने (murali sreeshankar) एकूण आठ मीटर लांब उडी मारून गट ब पात्रता फेरीत दुसरे आणि एकूण सातवे स्थान पटकावले आहे. या कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये लांब उडीच्या प्रकारात अंतिम फेरीत पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

अंजू बॉबी जॉर्ज ही जागतिक चॅम्पियनशिप लांब उडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय होती. पॅरिसमध्ये 2003 साली कांस्यपदक जिंकणारी देखील ती पहिली भारतीय आहे. आता या पुरूषांच्या गटात श्रीशंकरने (murali sreeshankar) हा इतिहास रचला आहे. इतर दोन भारतीय जेस्विन आल्ड्रिन (7.79 मी) आणि मोहम्मद अनीस याहिया (7.73 मी.) अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. ते गट अ पात्रतेमध्ये अनुक्रमे 9 व्या आणि 11 व्या स्थानावर राहिले.

अविनाश साबळेची पण मोठी कामगिरी
3000 मीटर स्टीपल चेसच्या मध्ये भारतीय लष्करातील अविनाश साबळे 8:18.75 या वेळेसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पात्रता फेरीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here