खुनाचा गुन्हा दाखल : कराडात दत्त चाैकात चाकू हल्ल्यातील युवकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | जुन्या भांडणाचा राग मनात धरून चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवसापूर्वी येथील दत्त चौकात दुपारी तीन वाजता घटना घडली होती. त्या प्रकरणात बैजुनाथ अशोक जिरगे (वय- 29, रा. दत्त चौक, कराड) व अजय उर्फ पिल्या अभयकुमार काळे (वय- 25, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक झाली आहे. त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुशांत उर्फ बबलू मुरलीधर काटकर (रा. भोई गल्ली, रविवार पेठ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, येथील रविवार पेठेतील बबलू यांच्याशी बैजुनाथ व अजय यांचा किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे बबलू बद्दल त्यांच्या मनात राग होता. तो़च राग मनात धरून त्यांनी बलूवर हल्ला केला. दि. 25 डिंसेबरला दत्त चाैकातील भूतकर चाळ येथे बबलू होता. त्यावेळी तेथे संशयित दुपारी तीन वाजता तेथे गेले. त्यांनी बबलूशी रात्री झालेल्या भांडणावरून वाद घालण्यास सुरूवात केली. बबलूला जाब विचारताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी बैजुनाथ व अजय यांनीही वाद घातला. त्यावेळी अजयने बबलूचे हात धरले. त्याचा फायदा घेत बैजुनाथ याने बबलूच्या पोटात चाकू भोसकला. जखमी झालेला बबलू खाली कोसळताच दोघांनी तेथून पळ काढला.

घटनास्थळी असलेल्या नागरीकांनी बबलूला रूग्णालयात हलवले. गेल्या चार दिवसापासून बबलूवर उपचार सुरू होते. आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यातील बौजुनाथ जिरगे व अजय काळे यांना अटक केली आहे. बबलूच्या मृत्यूमुळे पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बबलू येथील रविवार पेठेत राहतो. त्याचा मित्र परिवारही मोठा आहे, बबलूच्या मृत्यूची बातमी समजताच सकाळी येथील आझाद चौकात गर्दी केली होती. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार झाले.

Leave a Comment