आईला मारहाण करणाऱ्या युवकाचा खून : चिडलेल्या तरुणाचे कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण : आपल्याला लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम आई करत असते. ती आपले सर्वकाही लाड पुरवते. आपण आजारी पडलो तर ती दिवसरात्र आपली सेवा करते. मग आपल्या आईला जर कोणी काही म्हंटल किंवा मारहाण केली तर मग आपला राग अनावर होतो. आणि त्या रागाच्या भरात मग मुलगा खून करण्यापर्यंत निर्णय घेतो. अशीच घटना फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील दाते वस्ती येथे घडली आहे. या ठिकाणी राहत असलेला ३५ वर्षीय तरुण अविनाश मल्हारी सावंत याने आपल्या आईशी भांडण करून तिला मारहाण करणाऱ्या एका ३५ वर्षीय युवकाचा खून केला आहे. या प्रकरणी फलटण पोलिसांनी अविनाश सावंत याला अटक केली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील दाते वस्ती येथे गणेश सावंत व अविनाश सावंत हे दोघे राहत होते. याठिकाणी राहत असलेला गणेश सावंत शेळीचे दूध काढू लागला. मात्र, शेळीने दूध देण्यास नकार दिल्याने गणेश सावंत याने अविनाश मल्हारी सावंत याला हाक मारली. आणि दूध काढण्यासाठी बोलवले. पण अविनाश याने नकार दिला. अविनाश याने नकार दिल्यानंतर गणेश सावंत अविनाशच्या आईकडे त्याच्याबाबत तक्रार करण्यासाठी गेला. यावेळी गणेशचे अविनाश याच्या आईशी जोरात भांडण सुरु झाले. या भांडणावेळी गणेशने अविनाशच्या आईला मारहाण करण्यास सुरवात केली.

आपल्या आईला मारहाण केल्याने गणेशबदलाचा राग हा अविनाशच्या मनात तसाच होता. मग अविनाश याने योग्य संधी मिळण्याची वाट पाहिली. आणि बुधवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास दातेवस्ती इथे कोणी नसल्याचा अंदाज घेत गणेश सावंत याला त्याच्या घरासमोरच २३ वर्षीय अविनाश सावंत व एका अल्पवयीन मुलाने या दोघांनी पाणी सोडण्याच्या लोखण्डी पाण्याने व सत्तुराने वार करीत मारहाण करण्यास सुरवात केली.

तिघांच्या मारहाणीत गणेश सावंत हा गंभीर जखमी झाला. आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घडलेल्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. याची ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अविनाश सावंत याला अटक केली. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. या घटनेनंतर फलटण तालुका चंगळच हादरला असून या प्रकरणी कल्पना सावंत (वय ३७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहे.

Leave a Comment