काॅलेजवरून घरी येणाऱ्या भाग्यश्री मानेंचा खून : चार वर्षांनी पुन्हा चाैकशी सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पाटण तालुक्यातील तळमावले गावापासून काही अंतरावर असलेल्या करपेवाडी येथील महाविद्यालयीन युवतीचा घरी परतताना 2019 साली खून झाला होता. या खुनाचा अखेर चार वर्षांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून नरबळीसाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. त्यादृष्टीने आरोपीकडे कसून तपास केला जात आहे.

ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील भाग्यश्री माने या महाविद्यालयीन युवतीचा 2019 मध्ये निर्दयपणे खून करण्यात आला होता. संबंधित युवती महाविद्यालयात गेली होती. महाविद्यालयातून घरी येताना वाटेतच निर्जनस्थळी तिच्यावर हल्ला करून अज्ञाताने गळा चिरून तिची हत्या केली होती. पुराव्याअभावी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास ढेपाळला होता. त्यानंतर भाग्यश्री माने हिच्या वडिलांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

गत चार वर्षांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. अखेर या खुनातील एकेक कडी जोडताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून चार वर्षांनी या खुनाला वाचा फोडली आहे. या प्रकरणात कुटुंबातीलच एका व्यक्तीचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी रात्रीपासून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

Leave a Comment