5 कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी (Chandrasekhar Guruji) यांची 5 कोटींसाठी हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर याने गुरुजींचा (Chandrasekhar Guruji) खून केल्याचे समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर (Chandrasekhar Guruji) यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा मारेकऱ्याने केली आणि रागाच्या भरात मंजुनाथ मरेवाड याच्या सहकार्याने त्यांचा खून केला. चंद्रशेखर (Chandrasekhar Guruji) यांचा बहुतांश व्यवसाय मारेकरी महांतेश शिरूर पाहत होता. चंद्रशेखर (Chandrasekhar Guruji) यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती. मुंबईतील सरला वास्तूचे प्रमुख म्हणून काम करून शिरूर याने चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र या दरम्यान एक मालमत्ता पाच कोटींना विकल्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यामुळे गुरुजींनी महांतेशला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे याच रागातून महांतेशने गुरुजींची हत्या केली.

मारेकऱ्यांसाठी कवायत
पोलिसांनी मारेकऱ्यांची कवायत घेतली असून, पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर मारेकऱ्यांनी गुरुजींचा (Chandrasekhar Guruji) खून केल्याची कबुली दिली. बेनामी संपत्तीच्या पार्श्वभूमीवर हा खून केल्याचे मारेकऱ्यांनी म्हटले. यानंतर पोलिसांनी चंद्रशेखर यांच्याकडे किती मिळकत आहे, मालमत्ता कोठे आहे, कोणाच्या नावावर आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर चौकशी सुरू केली. दरम्यान, विश्‍वासातील दहाहून अधिक लोकांच्या नावे गुरुजींनी बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचे आरोपींनी उघड केले. हुबळी-धारवाडच्या आसपास चंद्रशेखर यांची 200 एकर जमीन बेनामी असल्याचे तपासात समोर आले आहे.

FIR मध्ये काही लिहिले ?
चंद्रशेखर गुरुजींचे (Chandrasekhar Guruji) पुतणे संजय अंगडी यांनी हुबळी विद्यानगर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 2008 पासून आरोपी महांतेश शिरूर हा गुरुजींकडे काम करीत होता. 2015 मध्ये महांतेश शिरूर याची मुंबई येथे कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. महांतेश कंपनीत येणाऱ्या लोकांकडून पैसे घेत असे, असा आरोप त्याच्यावर आहे. महांतेशसह 20 ते 25 जण काम करीत होते. याबाबत कंपनीचे एमडी व फिर्यादी यांना समजताच त्यांनी महांतेशला कामावरून काढून टाकले. याचा राग मनात धरून महांतेश शिरूर याने हुबळीतील गुरुजींच्या मालकीच्या अपार्टमेंटमध्ये भूखंड खरेदी केला होता. अपार्टमेंटमध्ये पार्किंगसाठी जागा नाही, सोलर सिस्टिम नसल्याबाबत ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता. यानंतर खटला मागे घेण्यासाठी तो गुरुजींकडे (Chandrasekhar Guruji) पैशांची मागणी करीत होता. त्यांना धमकी देत होता. त्यामुळे पैसे न दिल्याने त्याने खून केल्याची तक्रार संजय अंगडी यांनी केली आहे.

वीरशैव परंपरेनुसार अंत्यविधी
शहरातील शिवप्रभू ले-आउटच्या जागेत वीरशैव लिंगायत परंपरेनुसार चंद्रशेखर गुरुजी (Chandrasekhar Guruji) यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. हुबळी येथील मूरसावीर मठाचे कोट्रेश शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली हे अंत्यविधी झाले. या अंत्यविधीमध्ये राजकारण, उद्योग, साहित्य क्षेत्रासह गुरुजींचे हजारो भक्त सहभागी झाले होते.

हे पण वाचा :
लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले संघाचे कर्णधारपद

Leave a Comment