खूनाचा उलगडा ः नायगावमधील मुलांचा खून सख्या अल्पवयीन भावाकडून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील मुलाचा खून त्याच्याच अल्पवयीन भावाकडून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडण झाल्यावर त्याने लहान भावावर कुऱ्हाडीने वार केल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले.

याबाबत माहिती अशी, नायगांव गांवचे हद्दीत सोमवारी (दि- 10) दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वा . चे दरम्यान मौजे गुजरमळा नांवाचे शिवारात प्रशांत चन्नप्पा जमादार (वय 8 वर्षे) याच्या गळयावर व डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने मारुन त्याचा खून झाला होता. याबाबत चन्नप्पा नरसन्ना जमादार (वय- ३५ वर्षे रा .गुजरमाळ माळवरस्ता नायगांव, ता.खंडाळा जि.सातारा) यांनी दिले तक्रारीवरुन शिरवळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाची माहिती मिळताच गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक उमेश हजारे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिरवळ पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली.

सदरचा गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा , सातारा व शिरवळ पोलीस ठाणे यांना दिल्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा , सातारा व शिरवळ पोलीस ठाणे कडील तपास पथकाने घटनास्थळाचे सुक्ष्म निरीक्षण करुन फिर्यादी, त्याची पत्नी व मोठा मुलगा तसेच आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी यांचेकडे प्राथमिक विचारपूस केली असता. फिर्यादीचा मयत मुलगा याचे त्याचा मोठा भाऊ (वय १२ वर्षे) याचेशी दुपारच्या वेळेला भांडण झाल्याची माहिती समोर आली. त्याअनुशंगाने सदर विधी संघर्षग्रस्त बालक याचेकडे विचारपूस केली असता, तो माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले.  त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस केली असता. त्याने किरकोळ घरगुती भांडणातून रागाच्या भरात घरातील कुहाडीने त्याचा लहान भाऊ प्रशांत चन्नप्पा जमादार याचे डोक्यात व गळयावर वार करुन त्याचा खुन केला असल्याचे सांगितले. गुन्हयाची माहिती मिळाल्यापासून दोन तासाचे आत संवेदनशील खुनाचा गुन्हा कौशल्यपुर्ण तपास करुन उघडकीस आणल्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment