बुलढाणा प्रतिनिधी । भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मुस्लिम सामाजातील अनेकांची उपस्थिती होती. या मेळाव्याला आमदार फुंडकर यांनी संबोधित करत ‘आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प’ असल्याचे सांगितले.
आपण कुणालाही जेलमध्ये टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली नाही, कुणा विरोधकांच्या घरासमोरील रस्ता बंद केला नाही आपण फक्त आणि फक्त विकासावर भर दिला असून सबका साथ, सबका विकास हा माझा ध्यास असल्याचे प्रतिपादन फुंडकर यांनी या मेळाव्यात केले.
आमदार फुंडकर पुढे बोलतांना म्हणाले की, मतदार संघात मी निवडुन येण्याआधी १५ वर्षात विशेषत: मुस्लीम बहुल भागात विकास कामे न झाल्याने मुस्लीम समाज बांधवांची अवस्था वाईट झाली होती. हे सर्व पाहून मला अक्षरश: लाज वाटू लागली. त्यामुळे मी सबका साथ सबका विकास या केंद्र शासनाच्या धोरणानुसार मुस्लीम बहुल वस्त्यांसह संपुर्ण मतदार संघात रस्ते, नाल्या, व महत्वाच्या मुलभूत सुविधांची कामे केल्यामुळे केवळ ५ वर्षात हया मुस्लीम वस्त्यांचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. आणि येणा-या काळात हयापेक्षा दुप्पटीने कामे करण्यात येऊन मतदारसंघ समस्या मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. असा संकल्प फुंडकर यांनी यावेळी बोलून दाखवला.
इतर काही बातम्या-
खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा
वाचा सविस्तर – https://t.co/98s6xI6NKz@INCMumbai @bb_thorat @IYC #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर – https://t.co/OAryb3w1ji@ChDadaPatil @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @BJPLive @INCMumbai @INCPuneMahila #vidhansabha2019#MaharashtraElections2019 #NOTA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..
वाचा सविस्तर – https://t.co/X4caqNSGI6@1947democracy @PMOIndia @indianelection1 #ElectionCommission #Elections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019