तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाची मागणी

0
45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात आली आहे. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे असं मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटलं आहे.

तबलीगी जमातच्या कार्यक्रमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली- आरोग्य मंत्रालय
३० मार्चपर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या १२५१ होती आणि ३२ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, “COVID-१९ रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा सध्याचा काळ ४.१ दिवस इतका आहे. मात्र मागील महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर हा काळ ७.४ दिवस इतका असता.” म्हणजेच सात दिवसांऐवजी ४ दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here