मुस्लिम आणि आमचा DNA एकच; भाजप नेत्याचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या मुलाला म्हणजेच करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी ब्रिजभूषण मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या करण भूषण सिंह यांच्या प्रचारासाठी विविध भागात सभा पार पडत आहेत. यातीलच एका सभेमध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाला संबोधन एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह चांगलेच चर्चेत आले आहेत.

एका सभेमध्ये बोलताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “कोणी म्हणू अथवा नको पण तुमचे आणि माझे रक्त एक आहे. आपला डीएनए एकच आहे. जर आपला डीएनए तपासला तर तो सारखाच असेल.” हे वक्तव्य करत असताना ब्रिजभूषण चांगलेच भावुक झालेले दिसून आले. यावेळी बोलताना, गेल्या दीड वर्षांपासून माझ्याविरोधात षडयंत्र सुरू आहे. आम्हाला कोणतीही चूक न करता शिक्षा दिली जात आहे. 1996 मध्ये माझी पत्नी खासदार झाल्यानंतर माझ्याविरुद्ध कट रचला गेला. 2024 मध्ये माझ्यासोबत कट रचला गेला आता तर माझा मुलगा खासदार होईल. तेव्हाही कोणता ना कोणता कट रचला जाईल, असे ब्रिजभूषण यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, कोणी म्हणो किंवा ना म्हणो तुमचे आमचे रक्त एकच आहे. डीएनए चाचणी केली तर तुमच्या 5 पिढ्या आधी आमचे रक्त असते. त्यामुळे आम्हाला इतर गोष्टींमध्ये जायचे नाही. आम्ही तुमच्यासाठी बदनाम आहोत आणि तुम्ही आमच्यासाठी बदनाम आहात, म्हणून तुम्ही लोक आमच्या पक्षात बी पेरतात. परंतु पक्षात बी पेरण्याऐवजी कमळावर पेरा. ही संकटाची आणि आणीबाणीची वेळ आहे, म्हणून कृपया समर्थन करा” असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी वक्तव्यं केले.