कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा काँग्रेसचे मुस्लिम अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी पत्रव्यवहार करून होणाऱ्या ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्याबाबतची परवानगी मागितली आहे.
सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आहे. अशातच मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र सणदेखील पार पडणार आहे. त्यादिवशी होणारी नमाज देखील वर्षातील महत्वाची नमाज मानली जाते. मशिदीत किंवा मोहल्यातून किमान 25 जणांना कोरोनाचे नियम पाळून सामुदायिक नमाज पठणाची परवानगी ईदच्या सणानिमित्त मिळावी. अशी मागणी झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचेकडे पत्रकाद्वारे केली आहे.
सध्या कोरोनामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील कडक लाॅकडाऊन येत्या 15 मे पर्यंत वाढवल्याचे जाहीर केले आहे. त्या दरम्यानच रमजान ईद सण आल्याने झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे.