हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिवाळ्याला सुरुवात झाली की बाजरीची मागणी वाढू लागते. असे म्हणतात की थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते. बाजरीच्या भाकरीमध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे अनेक आजार देखील दूर होतात. ज्यामुळे थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर मानले जाते.
बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे
1 ) बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि इतर पौष्टिक घटक असल्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
2) बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोट लगेच भरते ज्यामुळे आपण इतर गोष्टी खाणे टाळतो याचा फायदा आपल्याला वजन नियंत्रित ठेवण्यास होतो.
3) बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णासाठी ते फायदेशीर ठरते. तसेच यामुळे ग्लुकोजची पातळी देखील वाढत नाही.
4) बाजरीची भाकरी पचायला सोपी असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच पोटा संबंधित कोणतेही विकार होत नाहीत.
5) बाजरीची भाकरी फायबर आणि प्रथिनेने समृद्ध आहे. त्यामुळे ती खाल्ल्यास शरीरातील अनेक आजार दूर होतात.