हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 जानेवारी रोजी वर्षातील पहिला सण मकर संक्रांती आली आहे. हा सण हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या सणानिमित्त पंचपकवान बनवले जातात तसेच पतंग उडवली जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का? मकर संक्रांती सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरेंसह साजरी केला जातो. या परंपरा जाणून घेण्यासाठी तुम्हाला या शहरांना भेट द्यावी लागेल.
हंपी – कर्नाटक राज्यातील हम्पी एक धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. याठिकाणी विजयनगर साम्राज्याचे अवशेष आणि त्या काळातील प्राचीन कलाकृती आपल्याला पाहायला मिळतील. मकर संक्रातीच्या काळामध्ये हम्पी मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच नृत्य पारंपारिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
कुर्ग – कर्नाटकमध्ये स्थित असलेले कुर्ग डोंगराची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. मकर संक्रातीच्या निमित्ताने याठिकाणी पोंगल उत्सव साजरी केला जातो. या सणानिमित्त रंगीबिरंगी कपडे परिधान करून पारंपारिक पंचपक्वान बनवून सण साजरी केला जातो.
कोवलम – केरळमधील हे ठिकाण सर्वात जास्त सुप्रसिद्ध आहे. मकर संक्रांतीच्या काळात याठिकाणी विशू हा सण साजरी केला जातो. यावेळी तेथील लोक नवनवीन कपडे घालतात मंदिरात जातात. देवाची पूजा करतात. तसेच या सणाचा आनंद लुटतात.
मुन्नार – मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर मुन्नार हे शहर सर्वात बेस्ट आहे. कारण या ठिकाणी संक्रातीच्या दरम्यान ओणम सण साजरी केला जातो. त्यामुळे या ठिकाणाला भेट दिल्यास तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम, समारंभ पाहायला मिळतील.
अलाप्पुझा – केरळमधील याठिकाणी मकर संक्रातीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये विशेष पूजा आयोजित केली जाते. तसेच बोटीमधून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक सर्वात लोकप्रिय आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट द्या.